बाणेर :
बाणेर परिसरातील ननवरे चौकाला जोडणाऱ्या १०० मीटर डीपी रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने स्थानिक नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. या अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना बिटवाईज चौकातून मोठा वळसा घ्यावा लागत होता, परिणामी वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली होती.
या संदर्भात स्थानिक सोसायट्यांच्या वतीने १७ मे रोजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ८ जुलै रोजी पुणे महापालिकेचे आयुक्त मा. नवल किशोर राम यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली, तर १२ जुलै रोजी मनपा अधिकाऱ्यांसह स्थळ पाहणीही पार पडली.
या पाठपुराव्यानंतर अखेर आजपासून ननवरे चौकातील प्रलंबित रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, वाहतूक कोंडीच्या समस्येत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत मनपा प्रशासन व जनप्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी