पौड :
भारतीय पारंपरिक खेळ ‘रोल बॉल’चे जनक आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रातील आदरणीय मार्गदर्शक मा. श्री. राजू दाभाडे यांनी आपल्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक विशेष सामाजिक उपक्रम राबवला आहे.
सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी ६० शाळांना क्रीडा साहित्य भेट देण्याचा संकल्प केला असून, त्याची सुरुवात आज पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पौड येथे करण्यात आली.
या प्रसंगी मुख्याध्यापिका वीणा कदम, पर्यवेक्षक नेत्रा काकडे, सरपंच लांडगे, पूनम दाभाडे आणि प्राजक्ता वाघवले यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्यांचे वितरण करण्यात आले.
मा. दाभाडे सर गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ क्रीडा व युवक विकासासाठी झटत असून, त्यांचे योगदान ‘रोल बॉल’सारखा जागतिक स्तरावर पोहोचलेला खेळ घडविण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा संस्कृती रुजविण्यापर्यंत अमूल्य आहे.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार क्रीडा साहित्यास सहज प्रवेश मिळावा, हीच खरी गरज आहे. कारण खेळातूनच मुलांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास साधता येतो.”
६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू झालेला हा उपक्रम पुढील काळात शाळांमध्ये फिटनेसची जाणीव निर्माण करून, नव्या पिढीला खेळाडूवृत्ती व निरोगी आयुष्याची वाट दाखवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





























More Stories
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम
*”‘मोठी स्वप्ने पाहा… भारत घडवा!’ — भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा बावधन येथील पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांपर्यंत !!!!*