बाणेर :
बाणेर परिसरातील अविष्कार सोसायटीमध्ये रहिवाशांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी संवाद साधला. या भेटीदरम्यान सोसायटीमधील नागरिकांनी अनेक स्थानिक प्रश्न मांडले. विशेषतः ड्रेनेज व्यवस्थेतील गंभीर अडचणी ही सर्वात महत्त्वाची समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येमुळे सोसायटीतील नागरिकांना आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रहिवाशांनी केलेल्या या प्रामाणिक मांडणीला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी स्वतः पाहणी करून परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रेनेज समस्येवर तातडीने उपाययोजना केली जाईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल.
समीर चांदेरे यांनी यावेळी सांगितले की, “स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्वरित कारवाई करणे हीच खरी जनसेवा आहे. अविष्कार सोसायटीतील नागरिकांना आम्ही लवकरच या समस्येतून मुक्त करू.”
या उपक्रमामुळे सोसायटीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवला आहे. परिसरातील इतर नागरिकांमध्येही या त्वरित प्रतिसादामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.



More Stories
*‘भक्तीचा उत्सव, पर्यावरणाची जपणूक!’ — पेरिविंकल बावधनमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या Eco-Friendly गणेशमूर्ती!!*
वसुंधरा अभियानाच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त राजाभाऊ गुडदे फाउंडेशनचा सन्मान
*पेरिविंकलमधील सुस शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हातून साकारला ‘पर्यावरणपूरक गणराया’!* *शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेतून परंपरेसोबत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!!!*