पौड :
पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल पौड, येथे हिंदी दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये हिंदी भाषेत भाषण, काव्यवाचन यांचा समावेश होता. या कार्यक्रमातून विध्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या समृद्ध परंपरेचे ओळख करून देण्यात आली. यातून देशातील विविधतेत एकता आणि भाषिक एकोप्याचे महत्त्व सांगण्यात आले.
संस्थापक आदरणीय राजेंद्र बांदल सर, संचालिका आदरणीय रेखा बांदल मॅडम व शिवानी बांदल मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व शाळेच्या मुख्यध्यापिका वीणा कदम, पर्यवेक्षिका नेत्रा काकडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. शाळेच्या हिंदीच्या शिक्षिका सुषमा दातीर, पूजा शिर्के यांना विध्यार्थ्यांनकडून गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.
काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून हिंदी विषयाचे राष्ट्रीय महत्व समजावून सांगितले. हिंदी शिक्षिका यांनी हिंदी भाषेचे महत्व आपल्या भाषणातून समजावून सांगितले. शाळेची विध्यार्थीनी संस्कृती पिंगळे हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यास सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी