March 22, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण येथे भाजपा कोथरूड उत्तर मंडलात सेवा पंधरवडा कार्यशाळा संपन्न…

पाषाण :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या जन्मदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात राबविण्यात येणाऱ्या “सेवा पंधरवडा” उपक्रमाचा भाग म्हणून कोथरूड उत्तर मंडलात राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यशाळेचे आयोजन आदिशक्ती योग भवन पाषाण येथे करण्यात आले.

या कार्यशाळेत सेवा पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे, नागरिकांशी थेट संवाद साधणे, त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे आणि “सेवा हीच संघटनाची ओळख” हा संदेश प्रभावीपणे पोहोचवणे यावर सर्व पदाधिकाऱ्यांनी भर दिला.

बैठकीदरम्यान कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की,
“सेवा पंधरवडा हा केवळ उपक्रम नसून समाजाशी एकात्मता साधण्याची आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची संधी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या कर्तृत्वातून सेवा संस्कार पुढे नेणे हीच खरी संघटनाची ताकद आहे.”

या कार्यशाळेत मंडलातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या कल्पना व मते मांडली. कार्यशाळा वातावरण उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरली.

पुढील काही दिवसांत कोथरूड उत्तर मंडलाच्या वतीने आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा, सामाजिक जनजागृती उपक्रम यांसारख्या सेवा कार्यक्रमांची मालिका राबविण्यात येणार आहे.

या वेळी माजी नगरसेविका ज्योती कळमकर व माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, सरचिटणीस सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बालवडकर, युवा नेते गणेश कळमकर, माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, राहुल कोकाटे, महिला अध्यक्ष वैदही बापट, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत चांदेरे तसेच सर्व आघाड्याचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.