बाणेर :
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी “सामर्थ्य संवादाचे” अभियान अंतर्गत नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला.
या संवादादरम्यान स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची दुरावस्था, सार्वजनिक सुविधा, वाहतूक कोंडी यासह अनेक प्रश्न मुरकुटे यांच्यासमोर मांडले. नागरिकांनी दैनंदिन जीवनातील अडचणींविषयी स्पष्टपणे भूमिका मांडल्याने संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जयेश मुरकुटे यांनी नागरिकांच्या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रभागातील प्रलंबित विकासकामांचा आढावा घेऊन त्यांची गती वाढविण्यासाठी आवश्यक ती कार्ययोजना आखण्याबाबत चर्चा केली.
जयेश मुरकुटे म्हणाले की, “नागरिकांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधणे ही खरी लोकशाही आहे. समस्या समजून घेऊन त्यावर योग्य तोडगा काढणे ही आपली जबाबदारी आहे.”
या संवाद उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी