बाणेर :
ननावरे चौक ते पॅनकार्ड रोड या मार्गावरील काम मागील अनेक वर्षांपासून रखडले होते. या कारणामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा मनसेचे युवा नेते अनिकेत मुरकुटे यांनी केला. त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर या रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.
या कामासाठी स्थानिक शेतकरी आणि पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय साधण्यात आला.
याबाबत बोलताना अनिकेत मुरकुटे म्हणाले की, “नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असल्याचे समाधान मला आहे. बाणेर परिसरातील नागरिक सुजाण असून श्रेय घेण्यापेक्षा त्यांच्या अडचणी दूर झाल्या ही खरी आनंदाची बाब आहे. स्थानिक शेतकरी व नागरिकांचे मौल्यवान सहकार्य मिळाल्यामुळे हे साध्य झाले.”
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “खरी कामगिरी कोणी केली याची जाणीव स्थानिक जागामालक आणि नागरिकांना आहे. श्रेय घेणाऱ्यांपेक्षा सातत्याने संघर्ष करणाऱ्यांना लोक ओळखतात.”
या निर्णयामुळे बाणेर परिसरातील नागरिकांची दीर्घकाळाची प्रतीक्षा संपुष्टात येऊन दळणवळण सुलभ होणार आहे.
यावेळी पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश पवार, अजित सणस, आणि स्थानिक शेतकरी अविनाश मुरकुटे उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी