हिंजवडी :
हिंजवडी येथील राहुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित मुळशी तालुकास्तरीय अंतरशालेय तायक्वाँदो स्पर्धा २०२५-२६ मध्ये पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुटच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विजयाचा झेंडा फडकावला.
🏅 पदक विजेते खेळाडू :
🔹 १४ वयोगट (मुली) – अनन्या जाधव (कांस्य पदक)
🔹 १७ वयोगट (मुली) – अनुष्का येवले (सुवर्ण पदक) 🥇 – जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! 🎉, आर्या खैरे (कांस्य पदक)
🔹 १७ वयोगट (मुले) – सोहम कदम (रौप्य पदक), आर्यन दुगाणे (रौप्य पदक), सार्थक राऊत (रौप्य पदक), गौरव साळवे (रौप्य पदक)
स्पर्धेत खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, आत्मविश्वास व शिस्त पाहून सर्वत्र कौतुक झाले. या यशामागे तायक्वाँदो मार्गदर्शक प्रवीण मोरे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल यांचे प्रोत्साहन, प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे मॅडम यांचे मार्गदर्शन तसेच विभाग प्रमुख सौ. पूनम पांढरे, सौ. सना इनामदार व सौ. पल्लवी नारखेडे यांच्या सहकार्यामुळे हा यशोत्सव शक्य झाला.
🌟 पेरिविंकल परिवाराने विजेत्या खेळाडूंच्या या दैदिप्यमान कामगिरीचे कौतुक करत – “आमचे खेळाडू हेच आमचे खरे मानाचे हिरो आहेत!” – अशा शब्दांत गौरव करून उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.




























More Stories
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम
*”‘मोठी स्वप्ने पाहा… भारत घडवा!’ — भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा बावधन येथील पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांपर्यंत !!!!*