पिरंगुट :
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट येथे हिंदी दिनाचा उत्सव अत्यंत उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे सभागृह फुलांनी, फलकांनी व विद्यार्थ्यांच्या देखण्या सजावटीने उजळून निघाले होते. या दिवशी विशेषतः पिवळ्या रंगाचा ड्रेसकोड ठेवण्यात आला होता. पिवळ्या रंगाची उब, आनंद व सकारात्मकता संपूर्ण वातावरणात पसरली होती.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी मनमोहक हिंदी भाषण, कविता, गोष्टी सांगणे, चित्रकला स्पर्धा, वर्ड चेन, मेमरी गेम्स व सर्कल गेम्स अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेचा व उत्साहाचा सुंदर मिलाफ सादरीकरणातून दाखवून दिला.
या वेळी चांदणी मिश्रा शिक्षिका यांनी हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना मातृभाषा आणि राष्ट्रभाषेप्रती प्रेम, आदर व जिव्हाळा जपण्याचा संदेश दिला. तसेच, पिवळ्या रंगाचे जीवनातील महत्त्व सांगत त्यांनी तो ऊर्जा, उत्साह व ज्ञानाचे प्रतीक असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण वातावरण अधिक प्रेरणादायी बनले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यजुर्वेद हाऊस व इयत्ता ९ वीचे विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या संयोजन व सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक व संस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच, पूर्वप्राथमिक विभाग प्रमुख सौ. पल्लवी नारखेडे, प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सना इनामदार व माध्यमिक विभाग प्रमुख सौ. पूनम पांढरे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम अधिक आकर्षक व संस्मरणीय बनवला.
अखेरीस पेरिविंकल परिवाराने हिंदी दिनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना “भाषा हीच खरी संस्कृतीची ओळख आहे” या प्रेरणादायी संदेशाने गौरविले.





























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*