बाणेर :
मित्रनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून फुटलेल्या ड्रेनेज पाईपलाईनमुळे नाल्यात सतत दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत होते. या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही समस्या मार्गी लागत नसल्याने परिसरातील रहिवासी मोठ्या गैरसोयीचा सामना करत होते.
या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने, सदर प्रश्नाची दखल महानगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात आली. त्यांच्या प्रयत्नांनंतर पुणे महानगरपालिकेच्या मुख्य खात्यामार्फत फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
या कामाच्या प्रारंभावेळी ड्रेनेज विभागाचे अनिकेत शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक अभय बागल, स्नेहा बेलेकर, योहान साहेब, आदित्य सरपोतदार, श्री. केदारी आदी उपस्थित होते. नागरिकांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व या तातडीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
परिसरातील नागरिकांनी सांगितले की, या दुरुस्तीमुळे येथील आरोग्य धोक्याची समस्या दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच दुर्गंधी व अस्वच्छतेच्या त्रासातून सुटका होऊन आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी