बाणेर :
बिटवाईज चौक परिसरातील ड्रेनेज चेंबर आणि अंतर्गत पाईप दुरावस्थेत असल्यामुळे सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत येऊन पादचारी तसेच प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या या तातडीच्या मागणीनुसार काल पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या पाहणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत सहभाग घेतला. रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी ड्रेनेज चेंबर व अंतर्गत पाईपच्या दुरुस्तीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. यानुसार तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
या प्रसंगी पुणे महानगरपालिका ड्रेनेज विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिकेत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर देखील उपस्थित होते.





























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”