बाणेर :
बाणेर परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी बिटवाईज चौक येथे ड्रेनेज चेबर रिपेअरिंग व चोकअप काढण्याचे काम नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली “अमोल बालवडकर QRT टिम” मार्फत पुणे महानगरपालिकेच्या सहाय्याने आज सुरु करण्यात आले.
यावेळी अमोलभैय्या बालवडकर यांच्या सूचनेनुसार सदर ठिकाणी वाहणारे पाणी थांबवण्यासाठी सर्व ड्रेनेज पाईप लाईन जेटिंग मशिनच्या साहाय्याने साफसफाई करून गाळ काढण्याचे काम देखील हाती घेण्यात आले. हे काम ड्रेनेज विभागाचे उपअभियंता श्री. सुहास अलभर व कनिष्ठ अभियंता श्री. अनिकेत शिंदे यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली पार पडत आहे.
स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि ड्रेनेज व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.





























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”