बालेवाडी (दि. 10 सप्टेंबर 2025) :
शिक्षक दिनानिमित्त बालेवाडी येथील बाबुराव गेणूजी (शेठजी) बालवडकर शाळेत भव्य सन्मान सोहळा पार पडला. मा. नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा उत्तर कोथरूड मंडल अध्यक्ष मा. लहू आण्णा बालवडकर व सरचिटणीस श्री. मोरेश्वरजी बालवडकर यांच्या सहकार्याने भाजपा कोथरूड उत्तर मंडलाच्या उपाध्यक्षा सौ. मृणाल गायकवाड व चिटणीस सौ. स्मृति जैन यांच्या वतीने हया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या वेळी नगरसेविका सौ. ज्योती ताई कळमकर व *सौ. स्वप्नाली ताई सायकर तसेच माजी अध्यक्ष सचिनजी पाषाणकर व उत्तर कोथरुड मंडल महिला मोर्चा अध्यक्ष सौ. वैदेहीताई बापट यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांना पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षकांनी खुपच छान पुस्तक दिल्याबद्दल मृणाल गायकवाड व स्मृती जैन यांचे आभार मानले . सर्व 55 शिक्षकांनचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यामुळे शिक्षकांचा गौरव होऊन समाजात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व उपस्थित मान्यवर पधाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमास निकिता माताडे, जागृती विचारे, विजया चांदोरकर, प्राजक्ता देवस्थळी, स्नेहल चौगुले, मोसमी बकोरे, हर्षदा थिटे, चद्रकांत जाधव व इतर पधाधिकारी उपस्थित होते .



More Stories
संत तुकाराम पालखी सोहळ्यानिमित्त बाणेर-बालेवाडी-औंध-पाषाण व्यापाऱ्यांकडून साडेतीन हजार उपवासाचे पदार्थांच्या पाकिटांचे वाटप..
पुढच्या पिढीचा विचार करा आणि आजच पाणी वाचवायला सुरवात करा” : जल संधारण तज्ञ सतीश खाडे बालेवाडी वेल्फेअर चा स्तुत्य उपक्रम
बावधनच्या ४ वर्षांच्या दियान चौधरीचा पराक्रम; सलग सिंहगड ट्रेक करत बनला ‘छोटा मावळा’!