बाणेर :
बाणेर परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारा एक महत्त्वाचा विकासकामाचा शुभारंभ आज झाला. ज्युपिटर हॉस्पिटल शेजारील मंत्रा-99 रिव्हरफ्रंट सोसायटीसमोर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले.
या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. राहुल बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष श्री. समीर चांदेरे, माजी नगरसेवक श्री. प्रमोद निम्हण यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच सोसायटीतील नागरिकांच्या साक्षीने पार पडला.
या डांबरीकरणामुळे नागरिकांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार असून परिसरातील अंतर्गत रस्त्यांना नवे रूप प्राप्त होणार आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी