बाणेर :
बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी या प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांशी थेट संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश संजय मुरकुटे यांनी राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे.
नागरिकांच्या समस्या, विकासकामांतील अडथळे आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न यावर मुरकुटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. जनतेच्या मनातील नाराजी ओळखून त्या प्रश्नांवर ठोस कार्ययोजना करण्याचे आश्वासन देत त्यांनी “फक्त आश्वासन नाही, कृतीला प्राधान्य” हा संदेश दिला.
“सामर्थ्य संवाद” या उपक्रमातून मुरकुटे यांनी स्थानिक तरुणाईला जोडून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वात प्रभागातील नागरिकांना एक सक्षम, धडाडीचे आणि सर्वसमावेशक नेतृत्व दिसत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयेश मुरकुटे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आश्वासक युवा चेहरा म्हणून पुढे आला आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी