March 19, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

“पेरिविंकल शाळा ही फक्त अभ्यासातच नाही तर सर्व क्रीडा स्पर्धांमध्येही अग्रेसर आहे” – तालुका क्रीडा संघ अध्यक्ष मा. सुनील सातव यांचे कौतुकोद्गार

भरे :

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे तसेच मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुळशी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा भरे येथील क्रीडा संकुलात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या भव्य स्पर्धेचे आयोजन चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट यांच्यातर्फे करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. उद्घाटनप्रसंगी तालुका क्रीडा संघ अध्यक्ष मा. सुनील सातव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले –
“पेरिविंकल शाळा ही केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसून, क्रीडा स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली पाहिजे. पेरिविंकल शाळेतील विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रात नव्हे तर कबड्डी, बुद्धिबळ, ऍथलेटिक्स अशा सर्वच क्रीडा प्रकारांमध्येही कौशल्य दाखवत आहेत. क्रीडेमुळे शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना आणि आत्मविश्वासाचा विकास होतो.”

शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले –
“खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. क्रीडेमुळे हार-जीत स्वीकारण्याची तयारी, परिश्रम करण्याची प्रेरणा आणि आत्मघडवणुकीची ऊर्जा मिळते. प्रत्येक खेळाडू हा भविष्यातील नेता असतो.”या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याला संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल यांचे विशेष प्रोत्साहन लाभले.
प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयोजन शिस्तबद्धरीत्या पार पडले.
माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार व पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांनी सहकार्य केले.

🏅 स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी दमदार खेळी सादर केली, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या झुंजींनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. खेळाडूंनी दाखविलेली जिद्द, शिस्त आणि क्रीडाभावनेचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

⚖️ पंचाची जबाबदारी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रकाश गाडे, सुरेश शिंदे, इकबाल खान, पुष्पा चौधरी, राजू बोडके, शरद कुपटे तसेच संतोष बनकर यांनी पार पाडली. त्यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनामुळे सामने अधिक रोमांचक झाले.

🏆 विजेते संघ :
🔹 14 वर्षाखालील वयोगटात
विजेता संघ, पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट
उपविजेता संघ,मामा साहेब मोहोळ स्कूल, पिरंगुट

🔹 17 वर्षाखालील वयोगटात–
विजेता संघ, पिरंगुट इंग्लिश स्कूल, पिरंगुट
उपविजेता संघ, महात्मा फुले हायस्कूल, लवळे

🔹 19 वर्षाखालील वयोगटात –
विजेता संघ, चाणक्य ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट
उपविजेता संघ, पिरंगुट इंग्लिश स्कूल, पिरंगुट

या स्पर्धेच्या यशामध्ये क्रीडा शिक्षक हनुमंत मणेरे व आकांक्षा पाटील यांच्यासह संतोष राठोड, परशाराम मेलगे, शरद गाडेकर, प्रवीण मोरे, अमीर पठाण, रेश्मा भोसले या शिक्षकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका खारकर यांनी उत्तमरीत्या केले.

कबड्डी स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, शिस्त, सहकार्य व नेतृत्वगुणांचा बहुमोल अनुभव मिळाला. मुळशी तालुका क्रीडा संघाने उत्कृट आयोजनाबद्दल पेरिविंकल पिरंगुट शाळेचे कौतुक केले. पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या योगदानामुळे व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही क्रीडास्पर्धा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली.