बाणेर :
नुकत्याच झालेल्या गौरी पूजनाच्या मंगलमय सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस, पुणे शहरच्या कार्याध्यक्षा पूनम विशाल विधाते यांनी प्रभाग क्रमांक ९ येथील बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील अनेक घरांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन गौरीच्या पूजन करून महिलांशी संवाद साधला.
या वेळी सौ पूनम विशाल विधाते यांनी भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. प्रत्येक घरातील सजावट, पारंपरिक पूजा आणि महिलांचा उत्साह पाहून त्या प्रभावित झाल्या. गौरी मातेच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौख्य नांदावे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
या भेटींदरम्यान, परिसरातील महिलांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. पूनम विधाते यांनीही प्रत्येकीशी आपुलकीने गौरी पूजनाच्या पारंपरिक पद्धतींबद्दल संवाद साधला.





























More Stories
तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पेरिविंकल पौडच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
सूस-नांदे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा आणि सनीज वर्ल्डचा पुढाकार
“तायक्वांदोच्या मैदानात पेरिविंकलचा दबदबा; १६ पदकांची शानदार कमाई!”