बाणेर :
‘विना सहकार नाही उदय’ या ब्रीदवाक्याचा अंगीकार करून यशस्वी वाटचाल करणाऱ्या बाणेर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बाणेर या संस्थेचा २७ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व उत्सवमूर्ती वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी महाराष्ट्र भूषण समाज प्रबोधनकार ह.भ.प. नितीन महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनातून सामाजिक बांधिलकी, सहकार्याचे महत्व आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम साधत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित प्रेक्षक मोठ्या संख्येने लाभान्वित झाले.
डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांना प्रास्ताविक करताना पतसंस्थेच्या 27 वर्षाच्या यशस्वी वाटचालीसाठी सहकार्य लाभलेल्या चारही शाखेच्या ठेविदार सभासद आणि कर्जदार तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि स्टाफ यांचे आभार मानले.
यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे म्हणाले की, अतिशय बिकट परिस्थितीमध्ये डॉ. दिलीप मुरकुटे यांनी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल केली आहे. त्यांनी अतिशय सचोटीने पतसंस्थेची पत टिकून ठेवली. त्यांनी सामाजिक कार्यात देखील खूप चांगले काम पूर्वीपासून केले आहे.
पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे म्हणाले, बाणेर नागरी पतसंस्थेसह बाणेर परिसरातील सहकार निर्माण केला आहे. कर्जदारांचा प्रमाणिकपणा व कर्ज फेडण्याची कृती यामुळे पतसंस्था व सहकार अधिक सक्षम होत असतो. दिलीप भाऊंनी लावलेली शिस्त म्हणून पतसंस्थेने यश संपादन केले आहे.
या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश भेगडे, शिवसेना(उबाठा) शहर प्रमुख गजानन थरकुडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, मृदुंगमणी पांडुरंग आप्पा दातार, पुणे जिल्हा बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, अशोक मुरकुटे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राहुल कोकाटे, प्रकाश बालवडकर, जीवन चाकणकर, नामदेव गोलांडे, ॲड.पांडुरंग थोरवे, ॲड.दिलीप शेलार, राजेंद्र मुरकुटे, गुलाबराव तापकीर, लक्ष्मण सायकर, राजेश विधाते, ओम बांगर, अंबादास कोकाटे, मौलाना मोहम्मद जफर कासमी, राम गायकवाड, संतोष तोंडे, विकास भेगडे, हिरामण तापकीर, महेश सुतार,ॲड.विशाल पवार , नितीन शिंदे, संतोष तापकीर आदी उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, प्रकाश भेगडे, बाळासाहेब चांदेरे, यांनी पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी विठ्ठल साखरे, नारायण भुमकर विणेकरी, प्रल्हाद जांभुळकर डॉक्टर आदित्य पाडाळे, डॉक्टर वैष्णवी सायकर, मीना सुभाष गोफणे शंकर केंगले, ॲड. अहमद खान ॲड. आशिष ताम्हाणे, ॲड. संजीव पाटील, ॲड. संकेत पाडाळे, ॲड.मानसी सुदाम मुरकुटे, स्वरा कळमकर, योगेश बांदल, सोनाली थोरात, सिया शिंदे, क्रांती धनकुडे, पंकज पाडाळे, प्रवीण कदम अमोल आंबेकर,आशिष पाडाळे, रवींद्र मोहोळ या मान्यवरांना भैरवनाथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन राजू शेडगे, व्हाईस चेअरमन संजय ताम्हाणे, वृषभ मुरकुटे, विजय विधाते, गणेश मुरकुटे, शितल भुजबळ, सतीश मराठे, रूपाली सायकर, नामदेव कळमकर, ॲड.सौरभ गोळे, ॲड.सुदाम मुरकुटे सदस्य, तसेच बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, महाळुंगे परिसरातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!