औंध :
वरची तालीम औंध येथील रणवीर हनुमान तरुण मंडळ यावर्षी आपली ११० वी वर्षपूर्ती साजरी करत आहे. दीर्घ परंपरेला साजेसा उत्साह आणि भक्तीभाव यंदाच्या उत्सवात दिसून येत आहे. मंडळाच्या वतीने आकर्षक फुलांची देखणी सजावट करून भाविकांना दैवी अनुभव मिळत आहे.
मंडळ हे केवळ धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमापुरते मर्यादित नसून सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. वर्षभरात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, रुग्ण साहित्य वाटप, हनुमान जन्मोत्सव तसेच सामूहिक तुळशी विवाह असे उपक्रम राबवून मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
या मंडळाच्या कार्यात अध्यक्ष विशाल गायकवाड, कार्याध्यक्ष विशाल शिंदे, सचिव विनोद बोडके, खजिनदार दिपक मदने यांच्यासह अमोल खताळ, स्वप्निल बारमुख, सागर मदने, प्रशांत कावडे, समिर खताळ, रोहित शिंदे, आशिष खोंड, सागर पवार, विपुल शिंदे, तुषार हरिषदे, जयंत खोंड, तुषार मदने व किरण ढवळे यांचा उत्साही सहभाग आहे.
औंध परिसरात गेली शंभराहून अधिक वर्षे परंपरा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकी जपत असलेले हे मंडळ आगामी काळातही असेच उपक्रम राबवत राहणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!