सुसगाव :
सामाजिक जाणिवेतून आणि अनावश्यक खर्चाला मर्यादा घालून समाजासाठी पुढाकार घेण्याचे उत्तम उदाहरण सुसगावातील दोन मंडळांनी घालून दिले आहे.
शिवछत्रपती मित्र मंडळ तापकीर वस्ती सुसगाव व श्री बाल मित्र मंडळ सुसगाव या दोन्ही मंडळांनी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील मराठा बांधवांना मदतीचा हात दिला आहे. आंदोलनकर्त्यांना खाद्यपदार्थ व आवश्यक वस्तू पुरविण्यासाठी या मंडळांनी प्रत्येकी ५००० रुपये देण्याचा निर्णय घेतला.
सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मंडळांनी उत्सवातील अनावश्यक खर्च कमी करून ही मदत केली. या उपक्रमामुळे गावात व परिसरात या मंडळांचे कौतुक होत आहे.
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी मंडळातील कार्यकर्त्यांचा विशेष सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले. समाजासाठी केलेले हे योगदान इतरांसाठी प्रेरणादायी ठरावे, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!