पाषाण :
बाणेर-पाषाण लिंक रोडवरील क्रिस्टल गार्डन सोसायटीत गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील कला आणि संस्कृतीची दृश्य घडविणारा सुंदर देखावा उभारला आहे. महाराष्ट्रातील वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला, हस्तकला, साहित्य, संगीत, लोककला अशा विविध क्षेत्रांचे दर्शन सोसायटीतील सदस्यांनी स्वतःच्या सहभागातून मांडले आहे.
गणपती देखावा मध्ये महाराष्ट्रातील विविध कला बरोबर चांगदेवांच्या भेटीसाठी निघालेले ज्ञानेश्वरांची भावंडे भिंतीवरून जाताना देखावा, लोहाराचा भाता हलतानाचे दृश्य हायड्रोलिक सायंटिफिक नॉलेज मिळण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. पैठणी घालून गोल फिरणारी बाई किंवा कुंभाराची फिरणारी चाक हे प्रमुख आकर्षण आहे.
शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडपासून भीमाशंकरचे देऊळ, कोकणातील किल्ले, अजिंठा-एलोरा लेणी, कात्रजचे शिल्प, मंदिरातील शिल्पकला यांचे सुंदर नमुने तयार करण्यात आले आहेत. हस्तकलेत लाकडी खेळणी, पेठ येथील चप्पल, नारायणपेठी साड्या, शाली यांच्या प्रतिकृती हाताने बनविलेल्या आहे.
चित्रकला, साहित्य कला, संगीत कला, लोककलेत तमाशा, पोवाडे, गोंधळ, भजन-कीर्तन या परंपरांचे दर्शन घडविण्यात आले. या कलादर्शनातून महाराष्ट्राची अद्वितीय कला-संस्कृती, वारसा आणि परंपरा यांचे दर्शन घडले असून, पुढील पिढ्यांपर्यंत हा वारसा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
बाणेर-पाषाण लिंक रोडवरील क्रिस्टल गार्डन सोसायटीत वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. रक्तदान शिबिर, योगा डे, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकं, चित्रकला, रंगोली, गणपती सजावट, क्राफ्ट, संगीत, स्वच्छता अभियान, झाडे लावणे, सौर ऊर्जा वापर, वॉटर हार्वेस्टिंग, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट स्पर्धा अशा उपक्रमांतून रहिवाशांना एकत्र आणले जाते. दिवाळी, होळी, गणेशोत्सव, गुढीपाडवा, महिला दिन, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी असे सर्व राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरे होतात.
क्रिस्टल गार्डन सोसायटीतील रहिवाशांचा सहभाग आणि उत्साह यामुळे हा उपक्रम अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा एकोप्याने सहभाग असल्याने मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करत आपल्या संस्कृतीचे जतन या सोसायटीने केले आहे.



More Stories
पुणे आयडॉल २०२६ ची महाअंतिम फेरी १० मे रोजी बालगंधर्व येथे – ५६० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘व्हॉइस ऑफ चॉईस’ विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राजभवन (लोकभवन) मार्ग विस्तारीकरणाला गती; कामाचा शुभारंभ, वाहतूक कोंडीवर लवकरच दिलासा – नगरसेवक सनी निम्हण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा