September 19, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट येथे ज्ञानेश्वरी वर्षपूर्ती सोहळा : विद्यार्थ्यांसाठी अध्यात्मिक पर्व 

पिरंगुट :

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, पिरंगुट येथे विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, भक्ती आणि संस्कारांचा अमृतोत्सव ठरलेला ज्ञानेश्वरी वर्षपूर्ती निमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले.

या विशेष प्रसंगी हरिभक्त परायण संजय महाराज भरम, मुळशी यांनी आपल्या रसाळ प्रवचनातून ज्ञानेश्वरीतील जीवनमूल्ये, नैतिकता व भक्तिमार्गाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर अत्यंत सोप्या व प्रभावी शब्दांत मांडले. त्यांच्या प्रेरणादायी वाणीतून मुलांना “शिकू या ज्ञानेश्वरीकडून जीवन कसे जगावे” हा अमूल्य संदेश लाभला.

🌟 “विद्यार्थ्यांच्या मनात संस्कार, अभ्यासात प्रगती आणि जीवनात समाधान – हेच ज्ञानेश्वरीचे खरे देणे!” 🌟

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे यांच्या नेतृत्वाखाली,
👉 माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे,
👉 प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार,
👉 पूर्व प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे
यांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांसाठी हा आध्यात्मिक प्रवास अविस्मरणीय केला.

✨ पेरिविंकल परिवाराचा प्रत्येक उपक्रम – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच…! ✨

 

You may have missed