भरे :
भरे कुस्ती संकुल येथे झालेल्या मुळशी तालुका कुस्ती स्पर्धेत पिरंगुटच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींनी आपला दमदार झेंडा फडकावत अभिमानास्पद यश संपादन केले.
✨ अंडर-14 गटात स्पृहा कालेकर हिने दाखवलेल्या जिद्दीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.
✨ अंडर-17 गटात हर्षदा बालकवडे हिने अतुलनीय खेळगडीपण व चिकाटी दाखवत प्रथम क्रमांक मिळवला.
✨ त्याच गटात वेदिका कालेकर हिने उत्तुंग प्रयत्नातून द्वितीय क्रमांक मिळवत शाळेच्या यशाचा मान वाढवला.
या उल्लेखनीय कामगिरीमागे विद्यार्थिनींना हनुमंत मनेरे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत आधारस्तंभ ठरणारे शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल यांचे योगदान लक्षणीय आहे. त्यांच्या पाठबळामुळेच विद्यार्थिनींना हे यश गाठता आले.
प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींना विविध क्षेत्रात सहभागी होण्यासाठी सतत प्रेरणा मिळते. तसेच माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार, व पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांच्या प्रोत्साहनामुळेच या यशाचा पाया भक्कम झाला.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी