बाणेर, (प्रतिनिधी) –
बाणेर-बालेवाडी येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि शहर उपाध्यक्ष, जीवन चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, मोठा प्रतिसाद दिला.
यावेळी आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी, महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर मार्गदर्शन मेळावा आणि आरोग्य तपासणी शिबिराचा समावेश होता. या शिबिरात ३८ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.
महिलांमध्ये वाढत्या ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुण्यातील नामांकित महिला डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. या शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मोठ्या संख्येने त्या सहभागी झाल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद पुणे शहराच्या माजी महापौर आणि माजी आमदार दीप्तीताई चौधरी यांनी भूषवले. यावेळी डॉ. प्रांजली गाडगीळ, स्वप्नना आठवले, आणि बाणेर भागातील योग शिक्षिका वैशालीताई बाळासाहेब सायकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी जीवन चाकणकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी