August 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थिनीचे कुस्ती स्पर्धेत उत्तुंग यश

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, बावधन
🏆 मुळशी तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२५ नुकतीच मुळशी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, भरे येथे उत्साहात पार पडली. विविध वयोगट व वजन गटांतील खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 

या स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन शाखा येथील विद्यार्थिनी अंतरा दीपक कांधरे हिने आपले कुस्तीतील कौशल्य व ताकद सिद्ध करत under-17 वयोगटातील ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले.

अंतराच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची जिल्हा स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिचे हे यश आमच्या शाळेसाठी खूप अभिमानाची बाब आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, कु. शिवानी बांदल, मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले, आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शालेय पातळीवर मिळवलेले हे यश तिच्या कठोर परिश्रम व चिकाटीचे द्योतक असल्याचे शाळेच्या प्राचार्यांनी सांगितले. तसेच पुढील स्पर्धांसाठी अंतराला शुभेच्छाही दिल्या.

पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन शाखेकडून अंतरा दीपक कांधरे हिचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐💐💐

 

You may have missed