पिरंगुट :
मुळशी तालुका बुद्धिबळ स्पर्धा राणी लक्ष्मीबाई विद्यालय, कसारांबोली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल, पिरंगुटच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा मान उंचावला.
👉 अंडर १७ मुलींच्या गटात
सुरभी दुखडे
कार्तिकी आल्हाट
या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळ सादर करून पुणे जिल्हा पातळीवर निवड मिळवली. त्यांच्या या कामगिरीमुळे शाळेचे नाव अधिक उज्ज्वल झाले.
👉 अंडर १७ मुलांच्या गटात
अर्णव सावंत
गणेश ओपल
दीप महाजन
कार्तिक साळवे
उज्वल चौधरी
👉 अंडर १४ मुलांच्या गटात
सर्वेश जोशी
आरव पोवाडे
शार्दूल गोळे
अयान शेख
👉 अंडर १४ मुलींच्या गटात
सई ढमाले
आरुषी नारखेडे
या सर्व विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.
या यशामागे विद्यार्थ्यांना हनुमंत मनेरे सरांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन व आधार देण्यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल संस्थापकांचे विशेष कौतुक करावे लागेल.
प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात सहभागी होण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन मिळते.शाळेच्या या यशामध्ये
माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे,प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार,पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे
यांचेही परिश्रम व प्रोत्साहन मोलाचे ठरले.
✨ पेरिविंकल परिवार सर्व विजेत्या खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या ✨



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन