पाषाण :
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, आणि महाळुंगे परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांच्या वतीने या परिसरात मोफत कायदेशीर मदत सेवा सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत, नागरिकांना विविध कायदेशीर बाबींवर विनामूल्य मार्गदर्शन आणि सल्ला मिळेल. यामध्ये सोसायटी धारकांसाठी विशेष कायदेशीर मार्गदर्शन, वाद-विवादांमध्ये मध्यस्थी, तसेच विविध कायदेशीर हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे या सेवांचा समावेश आहे. यासाठी भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष ॲड. तृप्ती जाधव आणि त्याची टीम कार्यरत असणार आहे.
सेवांचा तपशील:
* सेवा: मोफत कायदेशीर मार्गदर्शन आणि सल्ला
* उद्देश: सोसायटी धारक आणि सामान्य नागरिकांना कायदेशीर मदत करणे
* वेळ: प्रत्येक शनिवारी दुपारी २ ते ४
* ठिकाण: जनसंपर्क कार्यालय, बालेवाडी
* अधिक माहितीसाठी पत्ता: https://g.co/kgs/hywu4j7
या उपक्रमाचा लाभ घेऊन परिसरातील नागरिकांनी आपले कायदेशीर प्रश्न सोडवावेत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे कोथरूड विधानसभा (उत्तर मंडल) अध्यक्ष, श्री. लहु गजानन बालवडकर यांनी केले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी