बावधन :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, बवधन येथे करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटन ब्रिस्टल विद्यापीठाचे उच्चविद्याविभूषित श्री. निखिल सप्रे सर उपस्थित होते तसेच जिनीयस अकॅडमी च्या अध्यक्षा छाया पांचाळ या देखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स चे संस्थापक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर , संस्थेच्या संचालिका सौ. रेखा बांदल, शिवानी बांदल व प्राचार्या शुभदा कोलते यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
‘फिनटेक’ या विषयावर आधारित या व्याख्यानात विद्यार्थ्यांना Artificial intelligence (AI), रिसर्च थिअरी, तंत्रज्ञानातील प्रगती, तसेच वित्तीय क्षेत्र आणि तंत्रज्ञान यांचा परस्परसंबंध याबद्दल माहिती देण्यात आली. ऑनलाईन पेमेंट व व्यवहारांचे फायदे समजावून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाची जाण ठेवून त्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या वाटा उघडण्यास व बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यास निश्चितच मदत होणार आहे. शैक्षणिक वर्षातील विविध विषयांमध्ये, जसे भूगोल, गणित, विज्ञान, अर्थशास्त्र इत्यादी मध्ये असलेले तंत्रज्ञान, वित्तीय ज्ञान यांचा परस्पर संबंध आणि दैनंदिन जीवनात वापर कसा करायचा, हे खूप सुंदर रीत्या उदाहरणाद्वारे समजावून सांगितले.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बांदल सर यांचा नेहमी प्रयत्न असतो की विद्यार्थ्यांना नेहमी चांगले मार्गदर्शन व्हावे अन् त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या याच विचारातून असे नवनवीन व्याख्याने आयोजित कण्याची संधी आम्हाला मिळत असते. मुलांना करिअर निश्चित करण्यासाठी आजच्या या व्याख्यानाचा नक्कीच उपयोग होईल असा आम्हाला विश्वास आहे
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सायली गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या प्राचार्या शुभदा कोलते यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी