राजाभाऊ गुडदे फाउंडेशन अंतर्गत ‘ छाया-२’ उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न, पर्यावरणप्रेमींच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम
बालेवाडी(पुणे):
राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि वसुंधरा अभियान यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जुलै रोजी ‘छाया-२’ हा वृक्षारोपण उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमामध्ये ,श्रीमती छाया सुधीर वडोदरिया, कोमल सिंग राजपूत,अतुल भिडे, सदानंद भिडे,मनोज जोशी, अमोल इंगोले, सारंग चौहान, रश्मि चौहान,ईशान चौहान,सौरभ राक्षे, सुधीर चक्रे,सचिन वानखेडे,तारकेशवर राव, परमानंद तापडिया, अनिमेश गुडदे,अंश ठाकरे, अभिषेक पांडे,नफिजा कुमरी, अमृतांजली पांडे, मंगेश वाणी, विक्रम बोराडे, रिया बोराडे,ऋषिकेश किन्हीकर, नवनाथ कल्हाटकर, सुखदा भाईप, वैभव कुवर , पंकज दाते, सोनाली दाते, भार्गवी दाते,वेद दाते , रामचंद्रन वेणुगोपाल, विश्वजीत पाटील, समीर गावंडे, नितीन भोसले, जेमिनी पटवर्धन, अरुण पटवर्धन यांनी सहभाग घेतला. चिमुकल्या वेद दातेनी त्याच्या पाचव्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण कुटुंब सोबत वृक्षारोपणासाठी उत्साहात हजेरी लावली तसेच विहान गांगुर्डेनी दहाव्या वाढदिवसानिमित्त दहा वृक्षरोपण कुटुंबासमवेत केले.
या उपक्रमाद्वारे सुमारे २०० पेक्षा जास्त विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि हरित महाराष्ट्राच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
वृक्षारोपणाची सुरुवात सकाळी ६.१५ वाजता तुकाई टेकडी येथे झाली. या वेळी उपस्थितांचे मनोबल वाढवण्याचे काम संगीत गुडदे यांनी केले. पक्षी व रोपट यांच्या मनोगतात जे आहे त्याबाबत समर्पक दोन कविता सदानंद भिडे यांनी सादर केल्या. सदानंद भिडे यांच्या हस्ते सहभागी मुलांना उत्तेजनार्थ सर्टिफिकेट वाटप करण्यात आले. वृक्षारोपणानंतर वसुंधरा अभियानच्यावतीने सहभागी स्वयंसेवकांनी नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
राजाभाऊ गुडदे फाउंडेशनने यशस्वी आयोजन करून पर्यावरण रक्षणाचा आदर्श निर्माण केला असून, सर्व सहभागी नागरिकांचे, संस्थांचे आणि स्वयंसेवकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी