बाणेर :
बाणेर परिसरातील विवांता सोसायटी, अंबर सोसायटी, रचना सोसायटी, वर्षा पार्क सोसायटी, मल्हार सोसायटी, श्री पाल सोसायटी आणि हेरीटेज २८ सोसायटी या सोसायट्यांमधील रहिवाशांच्या नागरी समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल चांदेरे कुटुंबाचा जाहीर सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहर अध्यक्ष समीर चांदेरे यांनी या सोसायट्यांमधील रहिवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या.
या भेटीदरम्यान रहिवाशांनी अनेक नागरी समस्या मांडल्या होत्या. यावर तातडीने कार्यवाही करत, पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुराव चांदेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात आल्या. यामुळे समाधानी झालेल्या रहिवाशांनी एकत्र येत चांदेरे कुटुंबाचा सत्कार केला.
युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “प्रत्येक सोसायटीमधील रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी चांदेरे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून कटिबद्ध आहे. सोसायटीमधील रहिवाशांचा आमच्यावर असलेला अविरत विश्वास आणि त्यांनी कोणत्याही नागरी समस्येसाठी आम्हाला प्राधान्य देणे, हे खऱ्या अर्थाने माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.”
या सर्व सोसायट्यांमधील कमिटी मेंबर्स आणि रहिवाशांचे समीर चांदेरे यांनी मनापासून आभार मानले. त्याचबरोबर, हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी