बाणेर :
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने सतेज संघ,बाणेर यांच्या वतीने “कबड्डी महर्षी स्व . शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक निमंत्रित पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा – २०२५“ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पुरुष व महिला “पुणे लिग कबड्डी स्पर्धा २०२५” हि स्पर्धा बुधवार दि. १६ जुलै ते रविवार दि. २० जुलै २०२५ या कालावधी मध्ये म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलनातील बॅटमिंटन हॅाल येथे संपन्न होणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पुरुषांचे १२ संघ व महिलांचे १२ संघ तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकूण ३३६ खेळाडूंनी ( पुरुष व महिला ) आपला सहभाग नोंदविला तसेच पुणे लिग स्पर्धेकरिता पुरुषांचे ८ संघ व महिलांचे ८ संघ तयार करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातून एकूण ३५२ खेळाडूंनी ( पुरुष व महिला ) सहभाग नोंदविला आहे. सदर हि स्पर्धा मॅटवर होणार असून ४ मॅटच्या क्रीडांगणावर या स्पर्धेचा थरार अनुभवयास मिळणार आहे.
सदर या स्पर्धेकरिता
१ ) १२ महिलांचा संघ असून १२ x १४ = १६८
( १४ खेळाडू, १ व्यवस्थापक व १ प्रशिक्षक सह )
२ ) १२ पुरुषांचा संघ असून १२ x १४ = १६८
( १४ खेळाडू, १ व्यवस्थापक व १ प्रशिक्षक सह )
सदरची स्पर्धा सन २०१२ सालापासून सुरु केलेली असून आजपर्यंत हि स्पर्धा सुरु आहे, यामध्ये महाराष्ट्रातील निमंत्रित १२ पुरुष व १२ महिला संघ खेळणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील नवोदित खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे, सदर स्पर्धेतील विजयी संघांना रोख बक्षिस व चषक देऊन सन्मानित करणार आहोत. अशा स्पर्धेमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे खेळाडू निर्माण होण्यास मदत होते.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष , राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा. अजितदादा पवार यांनी सांगितले ज्यांनी कबड्डीसाठी योगदान दिले त्यांच्या नावे स्पर्धा घेणे योग्य राहील अशा सूचना बाबुराव चांदेरे यांना दिल्यावरून ज्यांनी कबड्डी हा खेळ सातासमुद्रा पलिकडे नेला ते कबड्डी महर्षी स्व . शंकरराव ऊर्फ बुवा साळवी करंडक या नावाने अखंडपणे हि स्पर्धा सुरु केली आहे.
त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील नवोदित खेळाडू तयार व्हावेत यासाठी पुणे लिग पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा सुरु करण्यात आलेली आहे हि स्पर्धा सुरु झाल्यापासून स्पर्धेचे सातत्य टिकून आहे या स्पर्धेतून पुणे जिल्ह्यासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडू निर्माण झाले आहेत. पुणे लिग स्पर्धे करिता पुरुषांमध्ये ८ संघ व महिलांमध्ये ८ संघ असे १६ संघ या लिग मध्ये खेळणार आहेत, पुणे लिग कबड्डी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना देखील रोख बक्षिस व चषक देऊन सन्मानित करणार आहोत असे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी सांगितले.
सदर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. १६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता मा. खासदार मुरलीधर मोहोळ ( केंद्रीय वाहतुक राज्यमंत्री ) यांच्या शुभहस्ते तसेच
मा.शिवाजीराव आढळराव पाटील (अध्यक्ष , म्हाडा पुणे जिल्हा )
मा. शितल तेली उगले ( क्रिडा आयुक्त , महाराष्ट्र शासन )
मा. शकुंतला खटावकर ( उपाध्यक्षा , महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. )
मा. सुनील टिंगरे ( अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, पूर्व विभाग )
मा. धीरज घाटे ( अध्यक्ष, पुणे शहर भाजपा )
मा. प्रमोद भानगिरे ( अध्यक्ष, पुणे शहर शिवसेना )
मा. सुभाष जगताप ( अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, पश्चिम विभाग )
मा. रुपाली पाटील ( कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे शहर )
मा. बाबुराव दत्तोबा चांदेरे ( सचिव, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. )
मा. नाविद मुश्रीफ ( अध्यक्ष गोकुळ दुध संघ कोल्हापूर )
मा. अतुल वल्लभ बेनके ( अध्यक्ष, पुणे जिल्हा कबड्डी असो. )
मा. सुनील चांदेरे ( उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक )
मा. मंगल पांडे ( खजिनदार, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. )
इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
विजेत्या संघांना खालीलप्रमाणे पारितोषिक देण्यात येणार आहे
“ कबड्डी महर्षी स्व . शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक निमंत्रित पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा – २०२५ “
पुरुष व महिला संघ
प्रथम क्रमांक :- २,५०,०००/- व चषक, पदक
द्वितीय क्रमांक :- १,५०,०००/- व चषक, पदक
तृतीय क्रमांक :- १,००,०००/- व चषक, पदक
चतुर्थ क्रमांक :- १,००,०००/- व चषक, पदक
सर्वोत्कृष्ट खेळाडू :- २५,०००/- व चषक, पदक
सर्वोत्कृष्ट चढाई :- २५,०००/- व चषक, पदक
सर्वोत्कृष्ट पकड :- २५,०००/- व चषक, पदक
त्याचप्रमाणे बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पुरुष व महिला “ पुणे लिग कबड्डी स्पर्धा २०२५ ”
पुरुष व महिला संघ
प्रथम क्रमांक :- २,५०,०००/- व चषक, पदक
द्वितीय क्रमांक :- १,५०,०००/- व चषक, पदक
तृतीय क्रमांक :- १,००,०००/- व चषक, पदक
चतुर्थ क्रमांक :- १,००,०००/- व चषक, पदक
सर्वोत्कृष्ट खेळाडू :- २५,०००/- व चषक, पदक
सर्वोत्कृष्ट चढाई :- २५,०००/- व चषक, पदक
सर्वोत्कृष्ट पकड :- २५,०००/- व चषक, पदक
पुणे लिग कर्णधार खालीलप्रमाणे
1) छावा पुरंदर :- जयंत काळे ( पुरुष ), ऋतुजा निगडे ( महिला )
2) लय भारी पिंपरी – चिंचवड :- प्रदास दिघोळे ( पुरुष ), रेखा राठोड ( महिला )
3) शिवनेरी जुन्नर :- अमित देवकाते ( पुरुष ), प्रियांका मांगलेकर ( महिला )
4) सिंहगड हवेली :- अजय नुनसावंत ( पुरुष ), गायत्री पठारे ( महिला )
5) वेगवान पुणे :- ओमकार लाळगे ( पुरुष ), निकिता खाडे ( महिला )
6) बलाढ्य बारामती :- आदिनाथ राऊत ( पुरुष ), सिद्धी बालकवडे ( महिला )
7) झुंजार खेड :- ओमकार काळभोर ( पुरुष ), नागीन्द्र कुरा ( महिला )
8) माय मुळशी :- महेश माने ( पुरुष ), श्रुतिका व्यवहारे ( महिला )
सदर पत्रकार परिषदेकरिता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सचिव दत्तात्रय झिंजुर्डे, सतेज संघाचे अध्यक्ष नासीर सय्यद, माणिक गांधिले, राजेंद्र ढमढेरे, संदीप पायगुडे, अर्जुन शिंदे, जंगल रणवरे, अर्जुन ननावरे, आदेश देडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


More Stories
“उच्च तंत्र की तंत्रमंत्र? अमोल बालवडकरांचा भोंदू खरात सोबत फोटो वरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा”
औंध ग्रामदैवत भैरवनाथ महाराज उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत तारीख जाहीर
लहानग्यांच्या स्वप्नांना मिळाले पंख: पेरिविंकल पिरंगुटमध्ये सीनियर केजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा!!!