बाणेर :
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनने कंबर कसली आहे. फाउंडेशनच्या वतीने ‘मान्सून सेफ्टी ड्राईव्ह 2025’ अर्थात पावसाळी सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पावसाळ्यादरम्यान बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे आणि पाषाण परिसरात नागरिकांना येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. रस्त्यावर किंवा सोसायट्यांमध्ये धोकादायक झाडे, झुकलेली किंवा वाळलेली झाडे, धोकादायक विद्युत खांब, उघड्या विद्युत तारा तसेच तुटलेली किंवा नसलेली चेंबरची झाकणे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) कोथरूड विधानसभेचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे म्हणाले, “पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. अनेकदा धोकादायक झाडे किंवा उघड्या विद्युत तारांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आम्ही या भागातील संभाव्य धोके वेळीच ओळखून ते महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
नागरिकांनी त्यांच्या परिसरातील समस्यांचे फोटो आणि अचूक ठिकाणासह संपर्क क्रमांक 7709775034 वर किंवा जयेश मुरकुटे जनसंपर्क कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ, बाणेर, पुणे या पत्त्यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



please solve drinking water and Road from Saarrthi skybay building