April 13, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सूस येथे BBSM 2025 क्रिकेट लीगचा चौथा पर्व उत्साहात संपन्न, पुरुष विभागात गंगा अ‍ॅक्रोपोलिस तर महिला विभागात राहुल आर्कस सोसायटीने पटकावले विजेतेपद..

सूस :

बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरलेली BBSM 2025 सोसायटी क्रिकेट लीगचा चौथा पर्व समीर चांदेरे यांच्या आयोजनाखाली 21 मार्च रोजी भव्य प्रारंभ झाला होता. काल या लीगचा समारोप प्रचंड उत्साहात, प्रेमात आणि अपार प्रतिसादात पार पडला.

 

पुरुष विभागात गंगा अ‍ॅक्रोपोलिस तर महिला विभागात राहुल आर्कस यांनी विजेतेपद पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले.

बक्षीस वितरण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे व सरला बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पुरुष आयोजन समितीचे अध्यक्ष अमोल भोरे आणि महिला अध्यक्ष पुजा किरण चांदेरे यांच्या नेतृत्वाखाली संयोजन समितीचे विशेष प्रयत्न स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मौल्यवान ठरले.

या लीगमध्ये एकूण १८६ सोसायट्यांमधून ३३४८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही केवळ स्पर्धा नव्हती, तर प्रत्येकाने आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून मैदानावर दिलेली उपस्थिती हीच या लीगची खरी यशोगाथा ठरली. खेळाडूंप्रमाणे त्यांच्या परिवारांनीही या लीगचा आनंद मनसोक्त लुटला.

या पर्वात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे महिला व पुरुष गटाला समान व्यासपीठ, समान पारितोषिक आणि समान सन्मान देण्याचा स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचा संकल्प. यामागे “सर्वांना समान संधी” ही मूलभूत भावना होती.

स्पर्धा रंगात आली असताना शेवटच्या टप्प्यात अचानक झालेल्या पावसामुळे मैदानाचे मोठे नुकसान झाले. मात्र खेळाडू, संघ व संयोजन समितीच्या समन्वयामुळे परिस्थितीवर मात करत ही स्पर्धा नव्या जोमाने पुढे नेली गेली.

पुरुष गटाचे विजेते:
• गंगा अ‍ॅक्रोपोलिस – विजेता
• सारथी सोव्हर्निर
• इक्विलाइफ A
• लाईफ मॉन्टेज
• रीजन्सी ओरियन
• माउंट युनिक
• यशविन आनंद
• एफ-रेसिडेन्सी
• कम्फर्ट झोन
• राहुल आर्कस

महिला गटाचे विजेते:
• राहुल आर्कस – विजेता
• युथिका सोसायटी
• परफेक्ट १०
• यशविन आनंद
• स्वर्णविलास
• रिव्हिएरा
• वीर भद्रनगर
• गोल्डन ट्रेलीस
• कुमार शांतिनिकेतन
• बालाजी व्हाइटफील्ड

या भव्य यशामागे BBSM संयोजन समितीची सातत्यपूर्ण मेहनत आणि काटेकोर नियोजन होते. खेळाडू, प्रेक्षक, सोसायट्यांचा भरघोस प्रतिसाद आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा चौथा पर्व अविस्मरणीय ठरला.

“ही केवळ स्पर्धा नव्हती, तर एकमेकांबद्दलच्या आपुलकीचं नातं यामध्ये अधिक खोल होतं”, असे भावनिक शब्दांत समीर चांदेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि सर्व सहभागी संघ, खेळाडू, महिला वर्ग व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

समीर चांदेरे
(युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे शहर)