बाणेर :
योगीराज पतसंस्थेला सन 2024 – 25 या आर्थिक वर्षात 3 कोटी 84 लाख रुपयांचा नफा प्राप्त झाल्याचे संस्थेच्या संचालक मंडळाच्या आर्थिक आढावा बैठक प्रसंगी जाहीर केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्थेला महाराष्ट्रातील आदर्श पतसंस्था म्हणून राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक प्रगतिचे सातत्य राखण्याची जबाबदारी महत्वाची होती. संस्थेच्या दोनच शाखांमध्ये सन 2024 – 25 अखेर 155 कोटी रुपयांच्या ठेवी, सभासद कर्ज 118 कोटी, इतर बँकेतील 61 कोटी रुपयांची गुंतवणूक, खेळते भांडवल 196 कोटी, एकत्रित व्यवसाय 173 कोटी तसेच 65.47% सी डी रेशो राखण्यात संस्थेने यश मिळविले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सभासदांना 15% लाभांश देण्यात येईल.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष शंकरराव सायकर, संचालक संजय बालवडकर, संचालिका वैशाली विधाते, रंजना कोलते, अलका सिरसगे, माजी संचालक वसंत माळी, अशोक रानवडे, खंडूजी मांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सिमा डोके, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!