सुस :
युवा नेते पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या वतीने आयोजित BBSM सोसायटी क्रिकेट लीग 2025 ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेच्या अनोख्या प्रवासाला सुरुवात करताना काल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.राहुल दादा बालवडकर, पुरुष आयोजन समितीचे अध्यक्ष अमोलभाऊ भोरे, महिला आयोजन समितीच्या अध्यक्षा सौ. पूजा चांदेरे, पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ अक्षता ताई मंगेश विधाते तसेच आयोजन समितीचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत सहभागी सर्व सोसायटी संघांना अधिकृत किट वाटप करण्यात आले. प्रत्यक्षात या स्पर्धेचे उद्घाटन आज होणार असून क्रिकेटचा थरार पहायला मिळणार आहे.
प्रत्येक संघाच्या २० खेळाडूंसाठी खास डिझाइन केलेल्या जर्सीचा हा सोहळा म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणीच! मैदानावर रंगणार्या या रोमांचक स्पर्धेसाठी सुस, बाणेर, बालेवाडी आणि म्हाळुंगेतील खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
“युवा नेते पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त BBSM सोसायटी क्रिकेट लीग 2025 चे आयोजन करताना खूप आनंद होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सुस, बाणेर, बालेवाडी आणि म्हाळुंगेतील सोसायटीतील नागरिकांना आपली क्रिकेटमधील प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे. मला विश्वास आहे की, ही स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल आणि या भागातील क्रिकेटला एक नवी दिशा देईल.” – समीर चांदेरे (युवक अध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)
स्पर्धेची वैशिष्ट्ये:
* युवा नेते पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
* माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचे मार्गदर्शन
* राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या वतीने आयोजन
* सुस, बाणेर, बालेवाडी आणि म्हाळुंगेतील सोसायटी संघांचा सहभाग
* प्रत्येक संघाच्या २० खेळाडूंसाठी खास डिझाइन केलेल्या जर्सी
* रोमांचक सामन्यांची मालिका
• खेळण्यासाठी उत्कृष्ट मैदान
स्पर्धेचे आयोजन:
* आयोजक: राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष समीर चांदेरे
* मार्गदर्शक: माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे
* सहभागी संघ: सुस, बाणेर, बालेवाडी आणि म्हाळुंगेतील सोसायटी संघ
More Stories
बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे आणि पाषाण परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनचा ‘मान्सून सेफ्टी ड्राईव्ह 2025’ उपक्रम..
औंध येथे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित पुणे आयडॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न*
महाळुंगे आणि सुस परिसरातील नागरिकांच्या समस्यां सोडविण्यावर भर देणार आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचे ‘जनता दरबार’, मध्ये नागरिकांना आश्वासन…