April 26, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर-बालेवाडी-सुस-महाळुंगेतील बचत गटांच्या 757 महिलांनी घेतला रंगपंचमीचा आनंद, सौ पूनम विधाते यांचे विशेष आयोजन…

बाणेर : 

महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबत त्यांच्या आनंदासाठी वामा वुमेन्स क्लबच्या वतीने सौ पूनम विशाल विधाते यांनी विशेष रंगपंचमी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे येथील बचत गटांच्या तब्बल 757 महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

 

कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल वामा वुमेन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. पूनम विशाल विधाते म्हणाल्या, “महिला बचत गट केवळ आर्थिक व्यवहारांसाठी नसून, महिलांसाठी एक सशक्त समाज निर्माण करण्याचे साधन आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महिलांना त्यांच्या रोजच्या व्यापातून आनंदाचे क्षण मिळावेत, हा आमचा उद्देश आहे.”

ताम्हाणे चौक, बाणेर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम व पारंपरिक होळी रंगांचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. उपस्थित महिलांनी रंगांची उधळण करत हा आनंदोत्सव साजरा केला.

राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या पुणे शहर कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. पूनम विशाल विधाते यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली.