May 15, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज च्या हर्षदा बलकवडेचा जोरदार विजय!

पुणे :

पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पिरंगुट च्या कु. हर्षदा जितेंद्र बलकवडे हिने आपल्या जोरकस ताकदीने तालुकास्तरीय *जोर* स्पर्धेत सर्वांना चकित करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या अफाट जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासामुळे शाळेच्या नावाला नवा गौरव प्राप्त झाला आहे.

 

ही प्रतिष्ठित स्पर्धा श्री शिवकल्याण प्रतिष्ठान, घोटवडेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील विविध स्पर्धकांमध्ये तीव्र चुरस असतानाही हर्षदाने आपल्या ताकदीचा प्रभावी ठसा उमटवला. तिच्या यशाने शाळेत आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच शाळेचे संस्थापक श्री. राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालिका शिवानी बांदल व मुख्याध्यापिका निर्मल पंडीत पर्यवेक्षिका पूनम पांढरे तसेच विभागप्रमुख इंदू पाटील , सना इनामदार व पल्लवी नारखेडे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी हर्षदाच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आणि तिच्या मेहनतीची प्रशंसा केली. तिच्या मेहनतीला आणि चिकाटीला सलाम करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“हर्षदा, तुझ्या जिद्दीने आणि मेहनतीने तू एक आदर्श घालून दिला आहेस. तू आमच्या शाळेचा अभिमान आहेस!” – पेरिविंकल परिवार.

हर्षदाच्या या विजयाने ती भविष्यात आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये चमकणार असल्याचा विश्वास वाटतो. तिच्या या यशाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!