बालेवाडी :
बालेवाडी येथील किरण सुयोग सोसायटी परिसरातील नागरिकांना खराब रस्त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. बाबुराव अप्पा चांदेरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. राहुलदादा बालवडकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष श्री. समीर बाबुराव चांदेरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत समस्या ऐकून घेऊन तात्काळ रस्त्याचा कामाचा शुभारंभ केला.
या वेळी, सोसायटीचे सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रस्त्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून काम लवकर पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
“नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि त्यांना चांगली पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय आहे,” – श्री. राहुल बालवडकर (उपाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर)





























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*