June 19, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडीतील अष्टविनायक चौकात शिवम बालवडकर यांच्या वतीने आयोजित भाजपा सदस्य नोंदणी अभियानास भरघोस प्रतिसाद..

बालेवाडी :

बालेवाडी येथील अष्टविनायक चौकात भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शिवम बालवडकर यांच्या वतीने भाजपा सदस्य नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

 

भाजपाच्या वाढत्या जनाधारासाठी महत्वपूर्ण उपक्रम

भाजपाचे विचार, ध्येयधोरणे आणि विकासात्मक कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांना पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी या सदस्य नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेद्वारे अनेक तरुण, व्यापारी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी भाजपाच्या सदस्यत्वासाठी नोंदणी केली.

कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या सदस्य नोंदणी अभियानात शिवम बालवडकर यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना भाजपाच्या विकास योजनांची माहिती दिली आणि पक्षाची सदस्यता घेण्याचे आवाहन केले.

नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

सदस्य नोंदणी मोहिमेला स्थानिक आणि सोसायटी मधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेषतः तरुणाईने मोठ्या संख्येने भाजपाच्या सदस्यत्वासाठी नोंदणी केली, यामुळे पक्षाच्या आगामी कार्यात युवा पिढीचा सक्रीय सहभाग दिसून येणार आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळत आहे. अधिकाधिक लोक भाजपाशी जोडले जावेत आणि या विकासयात्रेत सहभागी व्हावेत, यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन केले जाईल.”
शिवम बालवडकर(उपाध्यक्ष : भाजपा युवा मोर्चा पुणे शहर)