बालेवाडी :
बालेवाडी येथील द पर्ल सोसायटी, रेगुलस सोसायटी व बालेवाडी गावठाणा लगतचा असणारी ॲमिनीटी स्पेस जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर यांच्या वतीने स्वखर्चातून नागरिकांसाठी वापरायला वॉकिंग साठी व लहान मुलांना खेळण्यासाठी साफसफाई करून स्वच्छ करत नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. याच ठिकाणी सोसायटी नागरीक व ग्रामस्थ यांच्या समवेत २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ७६ झाडे लावण्यात आली.
यावेळी द पर्ल, रेगुलस, अदित्य ब्रीज पार्क, पार्क लाइन सोसायटी, sr. no. १ चे व बालेवाडी गावठाणातील रहिवाश्यांनी आवर्जून उपस्थित राहत राहुल दादा बालवडकर यांनी उपलब्ध करुण दिलेल्या ॲमिनीटी स्पेस जागेवर वृक्षरोपण करण्यासाठी सहभाग घेतला. अतीशय बिकट स्थिती झालेली ॲमिनीटी स्पेस जागा स्वच्छ करत नागरिकांना वापरणे योग्य बनवली. शिवाय या जागेमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश सर्वाना दिला त्याबद्दल नागरिकांनी राहुलदादांचे कौतुक केले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुलदादा बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाशतात्या बालवडकर, बालेवाडी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश रोकडे, ॲड. एस.ओ. माशाळकर, श्री. तारे, पो. पाटील आनंदा कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती बालवडकर अमेय जगताप, शशी बालवडकर, सप्रे मॅडम, विजय कांबळे आणि सोसायटीतील नागरीक महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी