सुस :
भोर, राजगड, मुळशी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.शंकरभाऊ मांडेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या वतीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्या उपस्थितीत सुस भागातील सुखवाणी ग्रेसिया मधील बैठक संपन्न झाली.
शंकर भाऊ मांडेकर यांच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून दिल्या नंतर आपल्या परिसरातील अडचणी सोडविण्यासाठी आपणास मदत होईल. परिसराचा विकास होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अग्रेसर असते. म्हणून विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून शंकर भाऊ मांडेकर यांना मतदान करून प्रचंड मताधिक्य मिळवून द्यावे..
– समीर चांदेरे
युवक अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर
यावेळी सोसायट्यांचे सर्व सन्माननिय चेअरमन, सेक्रेटरी व कार्यकारिणी सदस्य तसेच नागरिकांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी मा.शंकरभाऊ मांडेकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निश्चय केला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी