May 24, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस व प्रवक्तेपदी सुनील माने..

पुणे : 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्तेपदी पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार सुनील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे पत्र दिले. 

 

श्री. माने यांनी लोकसभा निवडणूकीपूर्वी राज्यात सर्वप्रथम भाजपाचा राजीनामा देऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते या पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात सक्रीय भाग घेतला. 

श्री. माने यांनी पुणे, मुंबई आणि नवी दिल्ली येथे पत्रकार म्हणून कारकीर्द केली. ॲग्रोवन या कृषी दैनिकाची पायाभरणी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. श्री. माने यांनी सामाजिक आणि राजकीयसह विविध विषयांत अभ्यास असून त्यांच्या भूमिका ते आग्रही पद्धतीने सरकार आणि लोकांपुढे मांडत असतात. स्थानिक प्रश्नांवर देश आणि परदेशातील विविध विषयांमध्ये श्री. माने यांनी काम आणि लिखाण केले आहे. त्यांनी सुमारे बावीस देशांचे अभ्यास दौरे केले आहेत.