बाणेर :
सतेज कबड्डी संघ, बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन व राहुलदादा बालवडकर युथ फाऊंडेशन यांच्या वतीने बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे भागातील हजारो कुटुंबांना दिवाळीचा सरंजाम वाटप हभप डॉ. पंकज उर्फ चेतनानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
दिपावली आली की गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून २००६ सालापासून सरंजाम वाटप उपक्रम सुरू असून गेली 18 वर्ष प्रभागातील हजारो कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे कार्य सतत सुरू आहे.
करंजा वाटप कार्यक्रमांमध्ये आयोजन कमिटीने अतिशय नियोजनबद्ध रित्या कार्यक्रमाची आखणी केली होती प्रत्येक नागरिकाला कमीत कमी वेळामध्ये कोणताही त्रास न होता सरंजाम कसा वाटला जाईल यासाठी आयोजकाने विशेष कष्ट घेतले.
भव्यदिव्य अशा आजच्या दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रमासाठी मदत करणारा प्रत्येक हात हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. या वर्षी देखील आमच्या सतेज संघ,बाणेर,राहुलदादा बालवडकर युथ फाऊंडेशन,बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व महिला कार्यकर्तांमुळे आजचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी जी मेहनत घेतली आणि ज्या तळमळीनं प्रत्येक प्रत्येकाला दिवाळीचा सरंजाम पोहोचवला, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो.
–समीर चांदेरे
युवक अध्यक्ष
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर
यावेळी बाणेर बालेवाडी भागातील विविध क्षेत्रातील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी