पौड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या परिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पौड शाखेत दिवाळीचे औचित्य साधून, रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी विध्यार्थी ,अतिथी, शिक्षक,पालक आणि ग्रामस्थ खास यांच्या साठी “दिवाळी पहाट” या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पेरीविंकल स्कूल ही विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक वारसाही जपते यात तिळमात्र ही शंका नाही.
कार्यक्रमाचा प्रारंभ हा पारंपरिक सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आला. पौड शाखेच्या शिक्षकांनी स्वागत गीत गाऊन प्रमुख प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. गायक कलाकार यांनी पालक वृंद विद्यार्थी व शिक्षक यांच्या समवेत दिवाळी पहाट रंगवली.
याप्रसंगी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल सर संचालिका रेखा बांदल मॅडम, शिवानी बांदल मॅडम व युवा संचालक यश बांदल सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित मॅडम आणि पिरंगुट शाखेचे मुख्याध्यापक अभिजीत टकले सर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सर्व गायक कलाकार यांचा सत्कार शाळेचे संस्थापक, संचालिका आणि मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला.
श्रीरामचंद्रांच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अनेक विविध प्रकारचे गाणे गाऊन या कार्यक्रमाला पालक वर्गाने तसेच विद्यार्थी ग्रामस्थांनी शिक्षक वृंद यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देउन दिवाळी पहाट या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या अंतर्गत थोड्याशा विश्रांतीमध्ये खाद्यपदार्थांचे विविध प्रकारचे स्टॉल्स देखील शाळेने आयोजित केले होते.त्याचा देखील विद्यार्थी आणि पालकांनी आस्वाद घेऊन आनंद घेतला. वेगवेगळ्या प्रकारचे टोकन घेऊन भेळ, कॉर्न चाट,चहा आणि मसाला दूध अशा विविध स्टॉलचे आयोजन केले होते.त्यामुळे रसिक प्रेक्षक आणि खवय्ये या दोघांच्या सानिध्याने कार्यक्रमाला रंगत आली.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी संगीत गायन, डान्स आणि किल्ला बनवणे अशा स्पर्धांचे तर पालकांसाठी रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधून प्रत्येकी तीन नंबर काढून त्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. सर्व स्पर्धेत विध्यार्थी व पालकांचा उस्फुर्त सहभग दिसून आला. यानंतर शाळेच्या संचालिका शिवानी बांदल मॅडम यांनी त्यांच्या अनमोल भाषणाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रदूषण मुक्त दिवाळी कशी साजरी करावी याचे महत्त्व समजावून सांगितले. हा सर्व कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उत्साहाने आणि आनंदाने संपन्न झाला.
त्यानंतर समस्त शिक्षकगण व कर्मचारी या सर्वांना शाळेतर्फे दिवाळी निमित्त बोनस व मिठाई वाटप करुन सन्मानित कऱण्यात येऊन दिवाळी महिनाअखेर असल्याने या 30 तारखेच्या आत पगार खात्यात जमा होण्याचे आश्वासन संस्थेचे संस्थापक माननीय श्री राजेंद्र बांदल यांनी सर्व स्टाफ ला दीले. एका महिन्यात बोनस वाटप करुन देखील दोनदा पगार करणारी पेरीविंकल ही मुळशी मधील एकमेव शाळा आहे असे मत व्यक्त करुन त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संस्था चालकांचे आभार मानले. सर्व या यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन संस्थेच्या तरुण तडफदार संचालिका शिवानी बांदल मॅडम व सदैव हसतमुख अशा शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका प्राजक्ता वाघवले मॅडम तसेच शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आले होते. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्टपणे पौड शाखेच्या संध्या देशमुख आणि साक्षी इफ्ते यांनी केले.
More Stories
निसर्गछाया उपक्रम कोथरुड सह सर्वांसाठी खुला – ना. चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा ज्येष्ठ नागरिक नागरिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न…
बाणेर-बालेवाडी परिसरातील नालेसफाईच्या समस्यांबाबत शिवम बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन..
बालेवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली आणि मिरवणूक उत्साहात संपन्न…