बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरुड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने बाणेर येथील नंदन अक्युरा सोसायटीच्या रस्त्याचे रुंदीकरण करून घेण्यात आले आहे.
सदर रस्त्याच्या कडेला झाडे झुडुपे वाढल्यामुळे तब्बल गेल्या 10 वर्षांपासून रस्ता अरुंद झाला होता. यादरम्यान एकही लोकप्रतिनिधीकडून याची दखल घेतली गेली नव्हती.
ही बाब जयेश मुरकुटे यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी लगेच जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने स्वखर्चातून सदर रस्त्याच्या कडेला असलेली झाडे झुडुपे काढून रुंदीकरण करण्यात आले.
याद्दबल येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करत जयेश मुरकुटे यांचे आभार मानले. तसेच परिसरातील इतर समस्यांचा पाढा वाचला. यावेळी सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा शब्द यावेळी जयेश मुरकुटे यांनी दिला. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी