बालेवाडी :
दिवाळी निमित्त बालेवाडी येथील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनतर्फे बाल दीपोत्सव-3 उपक्रम विकास अनाथाश्रम, चिखली, पुणे येथे राबविण्यात आला. संस्थेतील 55 अनाथ निराधार मुलांना दिवाळी फराळ, फटाके, मोती साबण, उटणे, सुगंधी तेल, बिस्किट, चॉकलेट, पावडर, शितपेय तसेच रांगोळी, दिवे, मुलीना मोतीच्या माळा, कानातले, टिकल्या, रुमाल, हेअरबँड, हेअर क्लिप, क्लचर इत्यादी भेट वस्तु देण्यात आल्या. तसेच प्रश्नमंजुषा घेऊन मुलीना बक्षीसे देण्यात आली. दहावीत ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले होते त्यांना विशेष स्टेशनरी किट” बक्षीस म्हणून दिले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनिषा बाकडे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण गुडदे, संगीत गुडदे, अनिमेष गुडदे, धनंजय गवारे, स्वप्नील जैन, अशोक शिंदे, विनोद ताडे,साहिथी, सारंग चव्हाण, कावेरी शिलम, साईराम मलिक, आनंद राजुरकर मनोज माने, शैलेश अपोतिकर, अमोल बगडिया, विनोद भुजाडे, राहुल मेनन, हरिष ताडला, अभिषेक कुमार, भुषण भांगड, गोपाल खडसान, कविता बोरोले, नरेश रेनुचिन्याला, अमित शहा, शितल दसलवार, अतुल भिडे, आशिष नांदेकर, संजय सोमण, अक्षय मालुसरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण गुडदे यांनी सांगितले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी