सुस :
पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांना टॅक्स संदर्भात मोठा दिलासा मिळाला असून ग्रामपंचायतच्या धर्तीवर ती नव्याने टॅक्स प्रणाली सुरू होणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांचे आपल्या परिसरातील सूस आणि म्हाळुंगे ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे शहर कार्याध्यक्ष सौ.पुनम विशाल विधाते यांनी आभार मानले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादा पवार हे नेहमीच नागरिकांचे जोपासत चांगले निर्णय घेण्याकरता अग्रेसर असतात. नव्याने समाविष्ट असणाऱ्या 32 गावांमध्ये आपले सुस म्हाळुंगे गावातील ग्रामस्थ महानगरपालिकेच्या टॅक्स प्रणालीमुळे चिंतेत होते. आजच शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या धरतीवर लागू असलेला टॅक्स नव्याने येणार असून, याआधीची सर्व बिले रद्द करण्यात आली आहेत. दादांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे त्याबद्दल दादांचे सुस आणि म्हाळुंगे ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार
– सौ. पूनम विशाल विधाते ( अध्यक्ष : वामा वुमेन्स क्लब/कार्याध्यक्ष : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर
More Stories
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, माळुंगे व औंध परिसरात शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रबोधन मंचाने राबविली जनजागृती मोहीम..
100% मतदानाकरीता बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांचा पुढाकार…
बालेवाडी येथे चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प..