November 22, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेविरोधात निषेध आंदोलन..

बाणेर :

बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेविरोधात निषेध व्यक्त करत महायुती सरकारच्या विरोधात काळया फीती लावून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

मालवणची घटना आपल्या अस्मिताला ठेच पोहचवणारी आहे, स्वाभिमान दुखावणारी आहे. महायुतीच्या भ्रष्ट कारभारामुळे आज बहुजनांच्या कुलदैवतांचा अपमान झाला आहे. हा इतिहासातील काळा दिवस आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या संदर्भात घडलेली महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. या घटनेची तसेच या पुतळ्याची सदोष आणि निकृष्ट दर्जाची निर्मिती करणारा कंत्राटदार याची सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी : स्वप्निल दुधाने(अध्यक्ष कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष)

आठ महिन्यातच  राजकोट किल्‍ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्‍याची दुर्घटना घडली. यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. केवळ टक्केवारीत अडकलेल्या महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण आहे. शिवछत्रपतींचा अवमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. या भ्रष्ट सरकारने राजीनामा द्यावा दोषींवर कठोर कारवाई करावी  : जयेश मुरकुटे (कार्याध्यक्ष कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने, कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, गिरीश गुरनानी अध्यक्ष युवक कोथरूड विधानसभा, कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष ज्योती सूर्यवंशी, प्रदेश सचिव मनीषा भोसले, सरचिटणीस मीनल धनवटे,  सचिन यादव, अमित भगत, महेश कणेरकर, किशोर शेडगे, सतीश अंभुरे, योगिता साबळे आदी उपस्थित होते.