बालेवाडी :
78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बालेवाडी येथील राजाभाऊ गुडदे फाउंडेशन तर्फे संमती बालनिकेतन मांजरी येथे प्रेरणा – २ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत तेथील मुलांना दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तू तसेच किराणा सामान व काही देणगी देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भिमराव सणस आणि धनश्री सणस हे लाभले होते. यावेळी ममता ताई सपकाळ यांनी संस्थेविषयी माहिती दिली तसेच सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याविषयी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष किरण गुडदे, संगीत गुडदे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच फाउंडेशनचे सहकारी धनंजय गवारे, दर्शना गवारे, आशा मालुसरे, ज्योती अमृतकर, पंकज बोरोले, अमोल बगाडिया आदी उपस्थित होते.



More Stories
ममता चौकासह बाणेर-बालेवाडीतील पाच चौकांत सिग्नल यंत्रणा; चार दिवसांत कार्यान्वित होणार, नगरसेवक अमोल बालवडकरांचा पुढाकार
*पेरीविंकल च्या बावधन, सूस, पिरंगुट,पौड, कोळवण व माले या सर्व शाखांमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी!!!*
सत्य, अहिंसा आणि देशसेवेचा संदेश; पेरिविंकल स्कूलमध्ये महात्मा गांधी- लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी