बालेवाडी :
डॉ. सुमेध मगर यांचे बालेवाडी येथे नव्याने सुरू केलेल्या ‘आय-स्पोर्ट्स’ हॉस्पिटलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या हॉस्पिटलमध्ये क्रीडा संबंधित ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, क्रीडा औषध, पुनर्वसन, आणि कार्यप्रदर्शन या सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या हॉस्पिटलच्या माध्यमातून बालेवाडी परिसरातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध होतील. एक चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल म्हणून नावलौकिक मिळवावा अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी यावेळी दिल्या.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्यासह उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



More Stories
ममता चौकासह बाणेर-बालेवाडीतील पाच चौकांत सिग्नल यंत्रणा; चार दिवसांत कार्यान्वित होणार, नगरसेवक अमोल बालवडकरांचा पुढाकार
*पेरीविंकल च्या बावधन, सूस, पिरंगुट,पौड, कोळवण व माले या सर्व शाखांमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी!!!*
सत्य, अहिंसा आणि देशसेवेचा संदेश; पेरिविंकल स्कूलमध्ये महात्मा गांधी- लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी